शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षांचा पाया आहे– विठ्ठल कांगणे.. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी)सेलच्या नूतन विद्यालयात 'परीक्षेला जाता- जाता' हा उपक्रम संपन्न.सेलू : दि. 5 'शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यां च्या बौद्धिक विकासा साठी तसेच भविष्या तील स्पर्धा परीक्षांचा मजबूत पाया घालण्या साठी अत्यंत महत्त्वाची आहे,' असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विठ्ठल कांगणे यांनी केले.मंगळवारी (दि. 4) नूतन विद्यालयात इयत्ता ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रवेशपत्र वाटप करण्यात आले. या प्रसंगीमुख्याध्यापक संतोष पाटील, उप मुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, बाबासाहेब हेलसकर, विजय धापसे, आशिष मगर, संजय घुगे, नारायण मस्के तसेच शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सुनील तोडकर उपस्थितत होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विठ्ठल कांगणे म्हणाले, स्पर्धा परीक्षे ची तयारी बालपणा पासून झाली पाहिजे. शिष्यवृत्ती परीक्षा ही केवळ आर्थिक मदत मिळवण्याचे साधन नाही, तर ती विद्यार्थ्यां च्या ज्ञान, तर्कशक्ती आणि गणनायोग्यता वाढवण्याचे प्रभावी साधन आहे. यासाठी नियमित अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि सराव महत्त्वाचा आहे.मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यां ना प्रोत्साहित करताना सांगितले की, नूतन विद्यालय हे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सातत्याने यशस्वी निकाल देणारे विद्यालय असून, यंदा ही विद्यार्थी उज्ज्वल यश मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला. सूत्रसंचालन बाळू बुधवंत यांनी केले तर आभार सुनील तोडकर यांनी मानले. प्रवेशपत्र वाटपाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यां मध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षांचा पाया आहे– विठ्ठल कांगणे..                                                                         
Previous Post Next Post