*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा रजत महोत्सव व पदाधिकारी मेळावा संपन्न**आ.करण देवतळे यांचा सत्कार* *विदर्भातील अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती*. ( महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती ) भद्रावती,दि.५:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचा रजत महोत्सव आणि पदाधिकारी मेळावा विदर्भातील असंख्य पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत नुकताच थाटात संपन्न झाला. येथील स्वागत सेलिब्रेशन सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे कार्याध्यक्ष निलेश सोमानी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार करण देवतळे यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि आद्य वृत्तसृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून महा. प्रांतिक तैलिक महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश देवतळे, वनप्रकल्प विभाग चंद्रपूरचे सहव्यवस्थापक स्वप्निल मरस्कोल्हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, वरोरा नगर परिषद माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, मानवाधिकार सहाय्यता संस्थानचे जिल्हा प्रमुख विनायक गरमडे, दैनिक महासागरचे जिल्हा संपादक प्रवीण बतकी, विदर्भ उपाध्यक्ष अनुपकुमार भार्गव, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे, जिल्हा संघटक रुपचंद धारणे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पत्रकारितेची जबाबदारी, लोकशाहीतील पत्रकारितेचे महत्त्व आणि कायदा हा चौथा स्तंभ म्हणून कसा असावा याविषयी मान्यवरांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे यांचा वाढदिवस केक कापून आणि त्यांचा सत्कार करुन साजरा करण्यात आला. तसेच यावेळी पत्रकार संघातर्फे नवनिर्वाचित आमदार करण देवतळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या विशेष कार्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणाऱ्या नागरिकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्यात राष्ट्रीय जलतरणपटू शिवराज मालवी, युवा सिने अभिनेता शक्तीवीर धिराल, पत्रकार मनीष रक्षमवार, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू धीरज पाशी आणि राष्ट्रीय खो-खो खेळाडू हार्दिक निंबाळकर यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे यांनी केले. सुत्रसंचालन प्रशांत कऱ्हाडे यांनी केले, तर आभार जिल्हा संघटक रुपचंद धारणे यांनी मानले. कार्यक्रमाला पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ भद्रावतीचे अध्यक्ष शाम चटपल्लीवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील दैदावार, संतोष शिवणकर, महेश निमसटकर, पुंडलिक येवले, अनिल इंगोले, विलास येरगुडे, निशांत देवगडे, दीपक आसुटकर, अतुल वनकर, विनोद वांढरे, वैभव निंबाळकर यांनी परिश्रम घेतले.

*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा रजत महोत्सव व पदाधिकारी मेळावा संपन्न**आ.करण देवतळे यांचा सत्कार* *विदर्भातील अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती*.                                                                    
Previous Post Next Post