सेलूत चोरट्यांद्वारे तीन लाखांची पिशवी लंपास. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.) सेलू : दि.07 भारतीय स्टेट बँकेतून तीन लाख रुपयांची रक्कमकाढून घरी परतणार्‍या सेवा निवृत्त कर्मचार्‍याच्या हातातील पिशवीच अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पळविली. ही घटना सेलूतील स्वामी विवेकानंद नगर भागात गुरुवारी सायं काळी घडली. स्वामी विवेकानंद नगरातील रहिवासी तथा कृषि उत्पन्न बाजारसमितीचे सेवानिवृत्त सचिव देविदास जोगराम चव्हाण (वय 59) हे गुरुवारी दुपारी भारतीय स्टेट बँकेत पैसे काढण्याकरीता गेले होते. 500 रुपयांच्या 100 नोटा असणारी प्रत्येकी 50 हजार रुपयांची 6 बंडले पिशवीत घेवून चव्हाण हे ऑटोने घरी परतू लागले, त्यावेळी नगरातील गात यांच्या निवासस्थानासमोर ऑटोतून उतरून ते घरी निघाले असता पल्सर कंपनीच्या मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या हातातील पैशाची पिशवी जबरदस्तीने हिकावून घेतली व ते दोघे सर्वोदय नगरच्या दिशेने पळून गेले. दरम्यान, या प्रकरणात चव्हाण यांनी सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताच अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उप विभागीय पोलिस अधिकारी जीवन बेनीवाल, सहाय्यक पोलिस अधिक्षक ऋषिकेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली व या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

सेलूत चोरट्यांद्वारे तीन लाखांची पिशवी लंपास.          
Previous Post Next Post