**पाथरी येथे शिवजन्मोत्सवा निमित्त* विविध कार्यक्रमाचे आयोजन. (.प्रतिनिधी // अनिल चव्हाण.)—————————————हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पाथरी तालूक्यात दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती *शिवजन्मोत्सवा* निमित्ताने पाथरी तालुक्याच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. या महत्वपूर्ण बैठकीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले तर बैठकी मध्ये तालूक्यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांना पुरस्कार, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम शिवजयंती शिवजन्मोत्सवाच्या दिवशी आयोजीत करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी गोपाळ दादा साखरे पाटील, उपाध्यक्षपदी भागवत वाकणकर, लखन टेकाळे, सचिव संजय पवार सहसचिव विठ्ठल थोरात कोष्याध्यक्ष नितीन थोरे कार्याध्यक्षपदी रितेश धर्मे प्रमुख मार्गदर्शन युवा सेनेचे जिल्हाप्रमूख मा. अमोल भालेपाटील , विष्णू काळे, अविराज टाकळकर अजिंक्य भाऊ नखाते , मुंजाभाऊ शिंगारे विक्रम गायकवाड आदीची यावेळी प्रमूख उपस्थिती होती.***

पाथरी येथे शिवजन्मोत्सवा निमित्त* विविध कार्यक्रमाचे आयोजन.                                                                 
Previous Post Next Post