सेलू येथील गजानन महाराज मंदिर संस्थान च्या वतीने प्रगट दिनानिमित्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी). सेलू : दि.10 फेब्रुवारी रोजी स्वामी विवेकानंद नगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिर कमिटीच्यावतीने तीन दिवसीय प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.18 फेब्रुवारी मंगळवार पासून या प्रगट दिन सोहळ्यास प्रारंभ होत असून दि.20 फेब्रुवारी रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे. यामध्ये दररोज सकाळी 5 ते 8 या वेळेत श्री च्या मूर्तीस भक्तांचे अभिषेक होणार असून 8 ते 11 यावेळेत संत गजानन विजय या ग्रंथाचे समूहिक पारायण होणार आहेत. दुपारी 3 ते 4 या वेळेत महिला मंडळाचे भजन होणार आहे. दि. 20 फेब्रुवारी या मुख्य दिवशी सकाळी 5 ते 10 या वेळेत श्री च्या मूर्तीस भक्तांकडून अभिषेक होऊन 11 ते 1:30 या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार व भागवताचार्य ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाआरती होऊन दुपारी 2 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून श्रवणाचा,दर्शनाचा तसेंच महाप्रसादाचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराच्या सर्व कार्यकारी संचालक मंडळातील सभासद आणि स्वामी विवेकानंदनगर मधील सर्व रहिवाशी यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी भाविकांनी आप आपल्या इच्छेने तन मन धनाने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0