प्रिन्स इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प नीती आयोगाकडे सादर. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.) सेलू : प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अटल टिंकरींग लॅबचा उत्कृष्ट उपयोग करत " एलपीजी गॅस लिकेज शील्ड" या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची यशस्वी निर्मिती केली आहे. साहिल राठोड, व्हिजन खाडे आणि पुष्कर पुरी या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या प्रकल्पाची निवड करण्यात आली असून तो मंजुरीसाठी नीती आयोगाकडे पाठवण्यात आला आहे.शालेय विद्यार्थ्यां मध्ये उद्यमशीलता आणि नवनिर्मितीला चालना देण्यासाठी एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठा तील अटल इनक्यु बेशन सेंटर (AIC) द्वारे अटल टिंकरींग लॅब स्टुडंट प्रोग्राम राबविण्यात येतो. 2024-25 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र आणि छत्तीस गडमधील नऊ शाळां मधून 14 प्रकल्प नीती आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असून, त्यामध्ये महाराष्ट्रातून एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा "गॅस लिकेज शील्ड" हा प्रकल्प निवडला गेला आहे. निवड झालेल्या प्रकल्पांना अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर सहभागी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय उद्योग समूह डसॉल्ट सिस्टम्स च्या सहाय्याने प्रकल्प विकसित करू शकणा र आहेत. यासाठी AIC-MITADT इनक्युबेटर फोरम मार्फत अटल टिंकरींग लॅब स्टुडंट इनोव्हेटिव्ह प्रोग्राम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली या ऑनलाईनसादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी AIC-MITADT इनक्युबेटर फोरमचे व्यवस्थापक निलेश पांडव होते.या वर्षी अपघात प्रतिबंधक यंत्रणा,जलकुंभापासून सक्रिय चारकोल निर्मिती, आपत्ती निर्देशक यंत्रणा, स्ट्रीट मार्ट, मानसिक आरोग्यासाठी चार्ट बोर्ड, एलपीजी गॅस लिकेज शील्ड, स्वयंचलित कृषी उपकरणे अशा विषयांवर विविध प्रकल्प सादर करण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान सेलूचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्रिन्स इंग्लिश स्कूलचे प्राचार्य कार्तिक रत्नाला आणि प्रगती क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रिन्स इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प नीती आयोगाकडे सादर.                                                    
Previous Post Next Post