प्रगट दिनानिमित्त मंदिरांमध्ये उसळली भाविकांची गर्दी. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.) स्वामी विवेकानंद नगर सेलू येथील प्रगटनदिन उत्साहात संपन्न झाला. सेलू : दि.20 सेलू येथील स्वामी विवेकानंद नगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिर समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रगट दिना निमित्ताने मंगळवार ते गुरुवार (दि.18 ते 20 फेब्रुवारी ) दरम्यान विविध धार्मिक कार्यांचे आयोजन करण्यात आले होते.दररोज सकाळी 5 ते 8 या वेळेत श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक,8 ते 11 या वेळेत श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथा चे पारायण झाले. कॉलनीतील महिला भाविकासह शहरातील अनेक महिला भाविकांनी श्री गजानन महाराज मंदिर फुलून गेले होते. दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत भागवताचार्य बाळू महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून काल्याचे कीर्तन झाले. या वेळी सेलू शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. महा आरती झाली त्यानंतर महाप्रसादासाठी लोकांना पंगती मध्ये जेवण दिले.दरम्यान, या प्रगट दिनानिमित्त शहरातील अन्य मंदिरांमधूनही दिवसभर भाविकांची दर्शनाकरीता व महा प्रसादासाठी मोठी गर्दी उसळली होती. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी विवेकानंद नगर मधील सर्व रहिवासी यांनी अतिशय सुंदर नियोजन करून सर्वांना महाप्रसाद मिळेल याची दक्षता घेतली.व परिश्रम घेतले.

प्रगट दिनानिमित्त मंदिरांमध्ये उसळली  भाविकांची गर्दी.           
Previous Post Next Post