प्रभु श्री विश्वकर्मा जयंती उत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन .. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती )भद्रावती दि.5:-प्रभु श्री विश्वकर्मा सुतार ( झाडे )समाज शाखा भद्रावती उत्सव समिती च्या वतीने दिनांक 10 फेब्रुवारी रोज सोमवार ला स्थानिक गुरूनगर येथील विश्वकर्मा सुतार झाडे समाज भवन येथे प्रभु विश्वकर्मा जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 8.30 ला विश्वकर्मा सुतार झाडे समाज उत्सव समिती चे अध्यक्ष मंगेश बुरडकर यांच्या शुभहस्ते समाज ध्वजाचे ध्वजारोहण होणार आहे सकाळी 9.30 ला पुडंलीक नवघरे व महेंद्र वांढरे यांच्या हस्ते घटस्थापना व देवतेचे पूजन होणार . त्या नंतर भजन आराधना , आरोग्य शिबीर, महिलांचे हळदी कुंकू, मनोरंजन कार्यक्रम , दहिहंडी व गोपाल काला, सांस्कृतीक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला माजी खासदार हंसराज भैय्या अहिर , आमदार करण देवतळे ,डॉ चेतन खुटेमाटे या मान्यवरांचेमार्गदर्शन लाभणार आहे.तरी सुतार झाडे समाज बांधवांनीया कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्षमंगेश बुरडकर, उपाध्यक्ष तेजश्री निवलकर, सचिव मंगेश अंड्रस्करसहसचिव मनोज बुरडकर, धंनजय निवलकर, दिपाली बोरीकर , संपदा बुरडकर, रुपाली राखुंडे, महेंद्र नवघरे, अरविंद राखुंडे, मनोज कायरकर , गोलु दारव्हनकर , यांनी केले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0