*प्रयत्न करा पण हार मानू नका - उदय अमोल पाटील*. पारोळा ) – पारोळ्याचे लोकप्रिय आमदार दादसो. अमोल चिमणराव पाटील यांचे चिरंजीव उदय पाटील यांची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील नामांकित रडगज विद्यापीठात कम्प्युटर इंजिनीअरिंग आणि अर्थशास्त्रासाठी निवड झाल्याबद्दल टायगर इंटरनॅशनल स्कूल, परोळा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेस्ट लेक्चर म्हणून एक उपक्रम राबवला जातो, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींना गेस्ट लेक्चरर म्हणून बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. या वेळी उदय पाटील, अभय सैंदाणे आणि शीतल रवींद्र पाटील यांनी गेस्ट लेक्चरर म्हणून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.उदय पाटील यांनी आपल्या अनुभवांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले, "शिक्षण हे एक सर्वोत्तम साधन आहे, ज्याद्वारे आपण आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचू शकतो. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आपल्याला यश मिळवता येते. परंतु, यश मिळवण्यासाठी आपल्याला कधीही हार मानू नये, आणि प्रत्येक अडचणीतून काहीतरी शिकावे."उदय पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील यश विद्यार्थी वर्गासाठी एक प्रेरणा बनले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शालेय आणि कॉलेज जीवनातील संघर्ष आणि त्यातून मिळालेल्या शिकवणींबद्दल सांगितले. ते म्हणाले, "खेळातून शिक्षण घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामुळे आपले दृषटिकोन विस्तृत होतात." टायगर इंटरनॅशनल स्कूलची त्यांनी विशेष प्रशंसा केली, कारण ही शाळा खेळांमधून शिक्षण देण्यावर भर देते.कार्यक्रमाच्या शेवटी, विद्यार्थ्यांनी उदय पाटील यांच्याशी संवाद साधत विचारलेले प्रश्न आणि त्यांच्यापासून मिळालेल्या उत्तम उत्तरांमुळे सर्व उपस्थितांना प्रेरणा मिळाली. शालेय प्रशासनाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.कार्यक्रमात शाळेचे चेअरमन श्री. रवींद्र पाटील, डाइरेक्टर श्रीमती रूपाली पाटील, मुख्याध्यापक श्री. पी. एस. पाटील, अजीम शेख, उपमुख्याध्यापक श्रीमती कविता सूर्यवंशी, विभाग प्रमुख श्रीमती नम्रता बेडीस्कर, श्रीमती वृषाली पाटील, तसेच क्लार्क श्रीकांत खैरनार आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे अमूल्य सहकार्य लाभले.
byMEDIA POLICE TIME
-
0