व्ही एस नाईक महाविद्यालयात 'आत्मनिर्भर युवती अभियानाचा' समारोप कार्यक्रम संपन्न कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे 'श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रावेर' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवती सभा अंतर्गत 'आत्मनिर्भर युवती अभियान' या सहा दिवसीय उपक्रमाच्या सहाव्या दिवशी समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अधिसभा सदस्य (क.ब.चौ.उ.म.वि. जळगाव) डॉ. पद्माकर पाटील यांनी युवतींनी 'आत्मनिर्भर व्हावे व निर्णयक्षम बनावे' असे आवाहन याप्रसंगी विद्यार्थिनींना केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील यांनी 'विद्यार्थिनींनी स्वतःमध्ये आत्मविश्वास बाळगावा व मिळणाऱ्या संधीचा सदुपयोग करावा' असे आवाहन विद्यार्थिनींना केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संदीप धापसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सभा समन्वयक डॉ स्वाती राजकुंडल यांनी केले. तसेच सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख डॉ नीता जाधव यांनी केले. सदर सहा दिवसीय उपक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. अनिल पाटील तसेच विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सत्यशील धनले यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले.या सहा दिवसीय अभियानाच्या पहिल्या दिवशी रावेर पोलीस स्टेशन मध्ये क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी सायबर गुन्हेगारी व सोशल मीडियाचा योग्य वापर या विषयावर विद्यार्थिनींची संवाद साधला व पोलीस स्टेशनचे कामकाज कशा पद्धतीने चालते याची माहिती विद्यार्थिनींना दिली. या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी श्रीमती श्रुती चौधरी यांनी 'युवती स्वयंरोजगार व शासनाच्या योजना' या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले अभियानाच्या तिसऱ्या दिवशी महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संतोष गव्हाड यांनी 'तान तनाव व्यवस्थापन' या विषयावर विद्यार्थिनींची संवाद साधला. तसेच उपक्रमाच्या चौथ्या दिवशी कृषी पर्यवेक्षक मा सचिन गायकवाड यांनी कृषी विषयक सरकारी योजनांची माहिती विद्यार्थिनींना दिली. या उपक्रमाच्या पाचव्या दिवशी डॉक्टर अमिता महाजन यांनी युवतींच्या आरोग्य विषयक समस्या वैयक्तिक स्वच्छता इत्यादी संदर्भात विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

व्ही एस नाईक महाविद्यालयात 'आत्मनिर्भर युवती अभियानाचा' समारोप कार्यक्रम संपन्न                    
Previous Post Next Post