श्री व्ही एस नाईक महाविद्यालयात हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न. (रावेर प्रतिनिधी सानिया तडवी )कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे 'श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रावेर' यांच्या संयुक्त विद्यमाने युवती सभा अंतर्गत 'आत्मनिर्भर युवती अभियान' या सहा दिवसीय उपक्रमाच्या पाचव्या दिवशी डॉक्टर अमिता महाजन यांनी विद्यार्थिनींना 'युवती आरोग्य विषयक समस्या व उपायोजन' या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी युवतींच्या विविध आरोग्यविषयक समस्यांचे अगदी सोप्या भाषेत निरसन केले. तसेच या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी श्री वैभव गाडे( प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोड) यांनी केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील तसेच उपप्राचार्य प्रा संदीप धापसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी युवती सभा समन्वयक डॉ स्वाती राजकुंडल तसेच इंग्रजी विभाग प्रमुख डॉ नीता जाधव उपस्थित होत्या.
byMEDIA POLICE TIME
-
0