*महाराष्ट्रातील गुजर व पोट जातींचा केंद्राच्या ओबीसी यादीत तत्काळ समावेश, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री श्री.विरेंद्र कुमार यांना मागणी... **महाराष्ट्र* राज्यातील *लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, सूर्यवंशी गुजर आणि बडगुजर* जातींचा *केंद्राच्या ओबीसी यादीत* समावेश करून या समुदायांना सामाजिक व आर्थिक संधी मिळण्यासाठी सक्षम करणे बाबत आज *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी *केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री श्री.विरेंद्र कुमार* यांची दिल्ली येथे भेट घेऊन आग्रहाची विनंती केली.*महाराष्ट्र सरकारने* या जातींचा केंद्रीय ओबीसी यादीत समावेश करण्याची शिफारस *राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग (NCBC)* कडे केली होती. NCBC ने 8 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये या महाराष्ट्राच्या जातींचा केंद्रीय ओबीसी यादीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारला म्हणजेच सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाशी चर्चा केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याजाती *उत्तर महाराष्ट्र* मधील *नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगांव* भागातील प्रामुख्याने रहिवासी असून, *गुजर व इतर गुजर पोटजातींना* केंद्र सरकारच्या ओबीसी यादीत मान्यता द्यावी म्हणून ओबीसीच्या उप-वर्गीकरण तपासणी समितीचे अध्यक्ष जस्टिस जी रोहिणी आणि ओबीसीच्या उप-वर्गीकरण तपासणी आयोग सदस्य जे. के. बजाज यांची देखील *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी दिल्ली येथे काही वर्षापूर्वी भेट घेऊन समक्ष निवेदन दिले होते.यावेळी केंद्र सरकारच्या वतीने गुजर व इतर गुजर पोट जातींना ओबीसी यादीमध्ये लवकरच समावेश करून मान्यता देण्यात येईल असे आश्वासन *केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री श्री.विरेंद्र कुमार* यांनी दिले. ओबीसी यादीत गुर्जर व इतर गुर्जर यांना केंद्र सरकार व राज्यसरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठीचा मार्ग खुला होऊन निश्चित गुर्जर व इतर गुर्जर यांना दिलासा मिळेल.
byMEDIA POLICE TIME
-
0