*पांढरे कपडे आणि काळे धंदे मटका माफिया वर मेहरबान पोलीस कार्यवाही कधी करणार**जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पोलीस अधिक्षकाकडुन केराची टोपली**दया कुछ तो गडबड है**. जालना प्रतिनिधी :-* जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मटक्या अवैध धंदे पुन्हा चोरी छुपा पद्धतीने सुरू असुन पोलीसांना कार्यवाही करण्यात अपयश येत असल्याने चित्र अंबड तालुक्यात देसुन येत आहे.आता असा म्हणण्याची वेळ आली आहे मटका माफिया पहेलवान पोलीस मेहरबान कारण मटका जुगार खेळत लाखो लोकांचे घर उध्वस्त झाली आहे. महाराष्ट्र मध्ये बंद असता सुध्दा अवैध मटका जुगार गल्ली बोळात आणि ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात असल्याचे सामान्य नागरिकांच्या बोलले जात आहे. राम भिवराजी लांडे यांच्या वर अनेक गुन्हे दाखल असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही.अंबड पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 14/02/2025 रोजी दुपारी 12.05 वाजेच्या सुमारास रमाजान व शिवजयंती निमित्त शांतता कमिटी ही पोलीस स्टेशन अंबड येथे आयोजित करण्यात आली होती.तेथे डिजीटल मिडीया लोकआत्मा न्युज चॅनल चे संपादक (पत्रकार) तरंग लक्ष्मणराव कांबळे येथे बातमी संकलन करण्यासाठी गेले होते.तेथे माटका माफिया राम भिवराजी लांडे सुद्धा आला होते.त्यांनर ते पत्रकार श्री कांबळे यांना म्हणाले की,तु माझी बातमी छापली? त्यांवर कांबळे म्हणाले की, अवधुत हरीभाऊ टाक यांनी तुमच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे व मला व्हिडिओ स्टेटमेंट दिले आहे.त्यावर बातमी छापल्याचा राग मनात धरून मटका माफिया राम भिवराजी लांडे म्हणाले की तु फार मोठा पत्रकार झाला का? तुझ्या कानाखाली आवाज काढेल आणि तु पोलीस स्टेशनच्या बाहेर भेट तुला दाखवतो तु जर परत बातमी छापली तर तुझे हात पाय काढुन टाकील तुला जिवे ठार मारुण टाकेल अशी धमकी मटका माफिया राम भिवराजी लांडे यांनी दिली.त्यांनतर श्री.कांबळे यांनी घडले ली हाकीकत प्रभारी अधिकारी सिध्दार्थ बरवाल आय पी एस यांना सांगितली त्यांनंतर त्यांनी एनसी नोंदवली त्यांनंतर कांबळे त्यांनी त्यांना मटका माफिया विरुद्ध कठोर कार्यवाही करण्याची विनंती केली. त्यानंतर श्री बारबाल यांनी कांबळे यांना म्हणाले की,सध्या एनसी दाखल करु तपास करु आणि नंतल गुन्हा दाखल करु असे सांगितले.सदर प्रकरण घडुन नंतर काही न झाल्याने कांबळे यांनी दिनांक 28/02/2025 रोजी अंबड उपविभागीय अधिकारी डि.वाय.एस.पी विशाल खांबे यांची भेट घेऊन कठोर कठोर कारवाई करावी यासंदर्भात तक्रार दाखल केली.त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी जालना यांना देखील तक्रार दाखल त्यानंतर तत्काळ कांबळे यांच्या प्रकरणाची दखल घेत पोलीस यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले.मात्र आदेशाला केराची टोपली पोलीस अधीक्षक जालना दाखल आहे.मटका माफिया राम भिवराजी लांडे हे सराईत गुन्हागार असुन त्यांच्या पोलीस स्टेशन हद्दीत या पुर्वी अनेक गुन्हे नोंद आहे.त्यांनी अवैध मार्गाने बेहिशोबी आमाप संपत्ती समली आहे. ते ठाकरे गट युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून काम पाहतात त्यामुळे त्यांच्यावर राजकीय वरद हस्त आहे त्यांनी जमवलेल्या बेहिशोबी संपत्तीची इडीमार्फत चौकशीची शिफारस करावी अशा गुंड वृत्तीच्या व्यक्तीचा मटका माफी याचा हद्दपारिता प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवावा. यापूर्वी अंबड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (bns) 2024 अन्वे कलम ३५२, ३५१, (२) अन्वे ) दिनांक 14/02/2024 रोजी दुपारी 02.30 वा एन सी नोंदवली आहे यांच्या व्यतिरिक्त अंबड पोलिसांनी मटका माफिया राम भिवराज जी लांडे याच्या विरोधात आज पर्यंत कार्यवाही केले नाही पोलीस कारवाई करत नसल्याने आरोपीचे मनोधैर्य वाढत आहे, पोलीस त्यांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे. मटका माफिया राम भिवराजी लांडे यांच्यापासून मला व माझ्या कुटुंबीयाच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. मी एक गरीब मागासवर्गीय कुटुंबातील आहे,आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे याच्यापासून माझ्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे पोलीस संरक्षण देण्यात यावे. माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला काहीही जीवित हानी काही घटना घडल्यास संपूर्ण जबाबदार राम देवराजजी लांडे हाच राहील याचीही गांभीर्याने नोंद घेऊन त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी लोकआत्मा न्युज चॅनल (डिजीटल मिडीया) चे पिडीत पत्रकार तरंग लक्ष्मणराव कांबळे यांनी केली आहे.

पांढरे कपडे आणि काळे धंदे मटका माफिया वर मेहरबान पोलीस कार्यवाही कधी करणार**जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पोलीस अधिक्षकाकडुन केराची टोपली**दया कुछ तो गडबड है**.                                                                                
Previous Post Next Post