सत्कारासह निवडणुकीत केलेल्या सहकार्याची परतफेड “केमिस्ट भवन” साकारूनच करणार… एरंडोल येथे औषधी विक्रेता संघातर्फे आमदार अमोलदादा पाटील यांच्या सत्कार. एरंडोल :- तालुका औषधी विक्रेता संघातर्फे आमदारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन जळगांव जिल्हा मेडीकल असोसिएशन अध्यक्ष सुनिलभाऊ भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या विधानसभा निवडणुकीत आपल्या सारख्या सुशिक्षित मंडळींनी सहकार्य म्हणजे आपण योग्य दिशेने जात असल्याचे निश्चित होते. दैनंदिन जीवनात वैद्यकीय क्षेत्र हे अत्यंत महत्वाचे आहे. गत काळात कोरोना महामारित आपण सर्वांनी खुप मोलाचे कार्य केले. तसेच विधानसभा निवडणुकीत देखील विकासाचा बाजुने खंबीरपणे उभे राहुन मला साथ दिली. आजच्या सत्कार व विधानसभा निवडणुकीत केलेले सहकार्य याची परतभेड म्हणुन लवकरच २० लक्ष रूपयांचे “केमिस्ट भवन” उभारणार असल्याचे यावेळी उपस्थित औषध विक्रेते बांधवांना ठोस आश्वासित केले.प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोजभाऊ पाटील, जळगांव जिल्हा मेडीकल असोसिएशनचे केमिस्ट हृद्यसम्राट सुनिलभाऊ भंगाळे, अनिलभाऊ झवर, शामभाऊ वाणी, विलासदादा बर्डे, लखीचंद जैन, दिनेशभाऊ मालू आदि..

सत्कारासह निवडणुकीत केलेल्या सहकार्याची परतफेड “केमिस्ट भवन” साकारूनच करणार…                         एरंडोल येथे औषधी विक्रेता संघातर्फे आमदार        अमोलदादा पाटील यांच्या सत्कार.                             
Previous Post Next Post