एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा मार्फत सामुहिक वन हक्क कामांना गती : कैलास शेंडेजिल्हा प्रतिनिधी नंदुरबारनंदुरबार - आज दिनांक १८ मार्च २०२५ रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा येथे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा, अक्कलकुवा आणि अक्राणी या तिन्ही तालुक्यांची सामुहिक तालुका कन्व्हर्जन समितीची ची बैठक आयोजित करण्यात आली होती. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६, नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ च्या अंतर्गत या तिन्ही तालुक्यात एकूण २४३ सामुहिक वन हक्क प्राप्त असून मागील बैठकीत १५१ आराखड्यांना अंतिम मंजुरी देण्यात आली होती. आता पुन्हा एकूण ५० आराखड्यांना तात्पुरती मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये तळोदा तालुक्यातील ३ गावे, अक्कलकुवा तालुक्यातील १३ गावे आणि अक्राणी तालुक्यातील एकूण ३४ गावांचा समावेश आहे. आदिवासी गावातील स्थलांतर थांबवून त्यांना वर्षभर गावातच रोजगार देण्याच्या उद्देश्याने तसेच आदिवासी उपजीविका बळकट करून त्यांना आर्थिक संसाधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देश्याने तसेच गावातील कमी झालेले जंगल वाढविण्याच्या उद्देश्याने या गावातील ग्रामसभेने सामुहिक वन हक्क संवर्धन आणि व्यवस्थापन आराखडे तयार करून त्याला मान्यता दिली असून आराखडे प्रकल्प कार्यालय तळोदा येथे मंजुरी साठी सादर केले होते त्यावर आज बैठकीमध्ये वाचन झाले असून आराखड्यात ज्या त्रुट्या आहेत त्या तातडीने वनविभागाणे दुरुस्त करून प्रकल्पाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच धरती आबा जनजातीय उत्कर्ष अभियान च्या अनुषंगाने सामुहिक वन हक्क प्राप्त गावांना केंद्र शासनाचा निधी प्राप्त होण्यासाठी एकूण ३० गावांचे अंदाजपत्रक तसेच वैयक्तिक वनपट्टे धारकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी क्लस्टर डेवलपमेंट प्लान तयार करून प्रकल्पाला सादर करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकारी यांनी कृषी विभाग आणि वन विभाग यांना दिल्या. या बैठकीला उपवनसंरक्षक मेवासी वनविभाग लक्ष्मण पाटील, तहसीलदार तळोदा दिपक धिवरे, गटविकास अधिकारी तळोदा के एम पवार, गट विकास अधिकारी अक्राणी मनोज भोसले, सहा. वन संरक्षक एस के पवार, ए. एन. आडे, वनपरिक्षेत्र अधिकारी सी. ए. काठे, अंबिका पाटील, शंतनू सोनवणे, एन एस एखंडे, एस एम रनदिवे, एम. बी. चव्हाण, एम बी शेख, नायब तहसीलदार डी एस निकम, शाखा अभियंता तळोदा, सहाय्यक प्रकल्प अधिकारी देवेंद्र वाणी, सर्व मनरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंचायत समिती व तहसील, लघु पटबंधारे शाखा अभियंता एम वसावे कनिष्ट अभियंता तळोदा, उपअभियंता लघु पाटबंधारे एम नरसाळे , कनिष्ट अभियंता आर सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी एम के पाडवी, विस्तार अधिकारी पंचायत समिती अक्कलकुवा एम पाटील, प्रकल्प समन्वयक अमोल राठोड, कनिष्ट लिपिक गोकुल शिंदे, ग्रामसभा प्रतिनिधी व अशासकीय सदस्य अशोक राऊत, संदीप वळवी, रतिलाल पावरा आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा मार्फत सामुहिक वन हक्क कामांना गती  :                               
Previous Post Next Post