हेनीट्रॅप चे जाळे .महिलेला एक लाख स्वीकारताना रंगेहात अटक.. रावेर तालुक्यातील एका धनवान व्यक्तीला हनीट्रॅप मध्ये अटकवून त्यांच्याकडून वारंवार पैसे उकळवणाऱ्या महिलेला एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहात अटक अटक करण्याने खळबळ उडाली आहे. रावेर तालुक्यातील एक इसम 2018 मध्ये स्वतःच्या कार मध्ये जळगाव येथे जात असताना एका 43 वर्षीय महिलेने गाडीत लिफ्ट मागितली. सोबत प्रवास केल्यामुळे त्यांची मैत्री वाढली. त्यामुळे तिने सदर इसमाला जेवणाला बोलाविले. तिने कोल्ड्रिंक मध्ये गुंगीचे औषध टाकून त्याला बेशुद्ध केले व त्या इसमासोबत शारीरिक संबंध करण्याचा बनाव केला. आणि त्याचा व्हिडिओ फोटोज काढून सदर इसमाच्या घरी व नातेवाईकांकडे आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी इसमास दिली. यामुळे सदर इसमाला भीतीपोटी वारंवार तिच्याकडे जावे लागत होते. यानंतर ती वारंवार खंडणी मागू लागली. 23 डिसेंबर 2023 पासून सदर महिला व तिचा मुलगा निर्मल पाटील (वय 21 ) या दोघांच्या खात्यात सुमारे 11 लाख रुपये टाकले होते. यामुळे त्या महिलेची मागणी वाढत गेली होती. 21 फेब्रुवारी 2025 रोजी सदर महिलेने फिर्यादीने 5 कोटी रुपये लेखी घेतल्याचा करारनामा पावती करून घेतला. या महिलेची पैशाची मागणी वाढत गेल्यामुळे .सदर इसम त्रस्त झाला होता. मग त्याने रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांना माहिती कळवली. यावरून बुधवार रोजी दुपारी संवा तीन वाजेच्या सुमारात जयस्वाल यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव. महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया वसावे. महिला पोलीस माधवी सोनवणे. पोलीस कॉन्स्टेबल महेश मोगरे. सुकेश तडवी. श्रीकांत चव्हाण. यांचे पथक पाठवून या महिलेवर कारवाईचे निर्देश दिले. तिला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. रावेर बऱ्हाणपूर मार्गावरील येथील एस एस बी टी मार्ट या दुकानाच्या मागील बाजूस. सदर महिलेने इसमास एक लाख रुपये घेऊन बोलावले होते. यावेळी पोलिसांनी महिलेने एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडून तिला ताब्यात घेतले. याबाबत सदर इसमाने दिलेल्या फरियादी वरून. रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करीत आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तर या महिलेने याच प्रमाणे इतरांना देखील. जाळ्यात अडकवले आहेत का.? या दृष्टीने पोलीस तपास करत आहे..

हेनीट्रॅप चे जाळे .महिलेला एक लाख स्वीकारताना रंगेहात अटक..                                                                      
Previous Post Next Post