वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्रातील समस्या लवकरच मार्गी लागणार.... ( महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती )भद्रावती दि.20:- आज शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना लोकसभा संघटक चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्र मुकेशभाऊ जिवतोडे यांनी सदिच्छा भेट घेऊन वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या आणि जनतेच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या चर्चेदरम्यान शिंदे साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच स्वतः वरोरा - भद्रावती विधानसभेत येऊन प्रत्यक्ष पाहणी करून समस्या सोडवण्याचे ठाम आश्वासन दिले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0