**शहरातील नागरिकासह शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध ; 50 वर्षात प्रथमच रस्ता* *@)> डॉ. अंकुशराव लाड.* *मानवत // प्रतिनिधी.*———————————————————— मानवत नगर परिषदेच्या मोंढातील परिसराला जोडणारा म्हणजेच प्रभाग क्रमांक १ मधील जुने मानवत, बौद्ध नगर भागातील रस्ता हा 50 वर्षां पासून प्रलंबित होता. एक ते सव्वा वर्षांपूर्वी शासन दरबारी पाठपुरावा करून यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला त्यामूळे या भागातील रस्ते विकासाचे काम हाती घेण्यात आले. तर शहरातील अनेक भागातील रस्ते विकास कामे पूर्ण झाले आहे.आज उर्वरित रस्ता विकास कामाचा शुभारंभ परिसरातील नागरिक, शेतकरी या सर्वांच्या उपस्थितीत डाॅ. अकूंशरावजी लाड यांच्या हस्ते उदघाटन करून करण्यात आला. या भागातील रस्ता खराब असल्याने मानवत शहरातील शेतकरी बांधवांची यामुळे गैरसोय होत होती, बैलगाडी असो किंवा वाहन असो शेतमाल घरी आणण्यासाठी शेतकर्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती तर अनेक वेळा शेतकर्यांची हेळसांड होत होती. रस्त्याचा प्रश्न सूटल्यामूळे निश्चितच या रस्त्यामुळे हे सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे मत आपल्या मनोगता मध्ये डाॅ. अकूंशराव लाड यांनी बोलतांना या वेळी व्यक्त केले.गेल्या अनेक दशकाचा प्रलंबीत रस्त्याचा प्रश्न सूटला प्रथमच रस्ता कामाचे उदघाटन करून रस्ते विकास कामाचा प्रारंभ केल्याबद्दल परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करूण डाॅ. अकूंशराव लाड यांचे आभार मानले तर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शेतकर्यांनी डाॅ. अकूंशराव लाड यांचा सामूहिक सत्कार केला.यावेळी रस्ते विकासकामाचे उदघाटना प्रसंगी मानवत शहरातील मराठा कंपनीचे मालक, प्रतिष्ठित व्यापारी प्रकाशराव भोसले, रामनिवासजी सारडा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, राम पंडितराव दहे पाटील , असलमभाई कुरेशी, प्रल्हादराव लाड, दत्तराव दहे, नंदुभाऊ कच्छवे, गणेश दहे, त्रिबंक मोगरे, प्रल्हादराव रासवे, कोंडीराम दहे, प्रभाकर दहे, श्रीरंग सोरेकर, कैलास वाघमारे, संदीप उदावंत , माजी नगर परिषद सदस्य शिवा पाटील, राजकुमार खरात, गणेश कुमावत, विनोद रहाटे, दत्ता चौधरी, श्रीधर कोक्कर यांच्या सह यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0

