.*चोरांची नजर आता मंदिरातील दानपेटीकडे ! भाविक भक्तांमध्ये भितीचे वातावरण*. मानवत // प्रतिनिधी.मानवत शहर हे अध्यात्मिक, सांस्कृतिक असल्यामूळेच शहरात मठा बरोबरच मंदीराची संख्या जास्त असलेल शहर म्हणून प्रसिध्द आहे. शहरातील देवालया मधून संस्कृतिचे जतन व्हावे म्हणून नेहमी कथा, किर्तने असे उपक्रम सूरूच असतात त्यामूळे मोठ्या प्रमाणात भक्तगण फूल नं फूलाची पाकळी म्हणून दानपेटीत मनोभावे सढळ हाताने दान टाकत असतात. नित्य चालणार्या उप क्रमाची दखल घेऊन मानवत येथील मलिकार्जुन मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रोकड लंपास केलीसविस्तर वृत्त असे की,मानवत येथील राष्ट्रीय महामार्ग ६१ लगत असलेल्या उड्डाणपूला जवळील *भगवान मलिकार्जुन* मंदिरातील दानपेटी रविवारी मध्यरात्री सुमारास दरम्यान फोडून चोरट्यांनी रक्कम लंपास केली. येथील मलिकार्जुन मंदिरातील दानपेटी रविवारी सकाळी दोन ते तीनच्या वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडून दानपेटीतील रक्कम लंपास केली. या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग ६१ लगत असलेल्या गोलाईत नगर मधील थळकरी सर मलकार्जुन मंदिरात सकाळी दर्शनासाठी आले असताना. त्यांच्या नजरेत दानपेटी फोडल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. सकाळी पत्रकार के. डी. वर्मा व शिवसेनेचे माजी शहर प्रमुख मुंजाभाऊ तरटे व थळकरी सर यांनी मलकार्जुन मंदिर लगत असलेल्या एडवोकेट बारहाते यांना उठवून घटने बाबत माहिती दिली. गेल्या आठवड्यात मलिकार्जुन मंदिर परिसरात शिवकथेचे आयोजन शिवरात्री निमित्त करण्यात आले होते. यावेळी शिव कथेच्या दरम्यान शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणावर पैसे दानपेटीत टाकले. तर गेल्यावर्षी ही शिवरात्री निमित्त शिवकथेचे आयोजन करण्यात आले होते. शिवकथा संपल्यानंतर आठ ते दहा दिवसात दानपेटी फोडण्यात आली होती. याही वर्षी चोरट्यांनी संधीचा लाभ घेऊन भाविक भक्तांच्या दानावर डाका टाकला *भगवान मल्लिकार्जून मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रोकड लंपास केली. चोरांनी फोडलेल्या मंदिरातील दानपेटीमध्ये कीती रक्कम होती यांचा अदांज व्यक्त करता येत नाही. भक्तांनी दानपेटीत टाकलेले दान चोरांनी लंपास केल्यामूळे भक्त गणातून नाराजीचा सूर निघत असून मंदीराची दानपेटी आता सूरक्षित राहिली नसल्यामूळे भक्तगणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरातील मंदीर परिसरात गस्तवाढविण्याची गरज असल्याचे मत भाविक भक्तातून व्यक्त केल्या जात आहे...
byMEDIA POLICE TIME
-
0