*शैलेंद्र देसले पोलीस निरीक्षक शहादा यांना सेवेतून निलंबित करून पदावरून हटवा- बिरसा फायटर्सची मागणी**. आदिवासींची बाजू घेतल्यास तुमच्यावरच बाईचा गुन्हा दाखल करू;पोलीस निरीक्षकांची सामाजिक कार्यकर्ते सुशिलकुमार पावरा यांना धमकी**आदिवासी महिलांची तक्रार न घेता फिर्यादी आदिवासी व्यक्तीलाच लाॅकअपमध्ये टाकले; मराठा समाजाच्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करीत नसल्याचा पोलीस निरीक्षकांवर आरोप*शहादा प्रतिनिधी: आदिवासी महिलांची तक्रार घेत नाही,तुम्हाला काय करायचे ते करून घ्या,बाईला बोलवून तुमच्यावरच ३५४ चा गुन्हा दाखल करतो अशी धमकी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना देणा-या व ज्याला जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली आहे,अशा आदिवासी तक्रारदार पिडीतास अश्लील शिवीगाळ करीत मारहाण करून धक्काबुक्का करीत त्यालाच लाॅकअपमध्ये घालायला लावणा-या,आदिवासींची तक्रार न घेऊन मराठा समाजाच्या लोकांचीच तक्रार घेणा-या , पोलीस ठाण्यात जातीभेद करत एकतर्फी आदिवासी समाजाच्या लोकांवर अन्याय करणा-या,पोलीस ठाण्याचा मनमानी कारभार करणा-या श्री.शैलेंद्र देसले,पोलीस निरीक्षक ,पोलीस ठाणे शहादा याच्यावर आदिवासीला मारहाण,अश्लील शिवीगाळ करणे,फिर्यादीस लाॅकअपमध्ये बंद करून आरोपीसारखी वागणूक देणे,सामाजिक कार्यकर्त्यास धमकी व दमदाटी करीत गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करा व शहादा पोलीस निरीक्षक पदावर तात्काळ हटवा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,बिरसा फायटर्स लोहाराचे उपसरपंच सुरेश पवार, रामदास मुसळदे,बिरसा फायटर्स टूकीचे उपसरपंच दिलीप मुसळदे,बिरसा फायटर्स प्रभूदत्तनगरचे कार्यकर्ते अरूण पावरा,सुभाष पावरा,मदन पावरा सह पिंपर्ळे गांवातील आदिवासी महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की,दिनांक २८ मार्च २०२५ रोजी पिंपर्डे ता.शहादा येथे कृष्णा भगवान वाघ या आदिवासी व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ करून मराठा समाजाच्या अंदाजे ६ जणांनी लोखंडी पाईपनी जबर मारहाण केली.पिपर्ळे गांवातील आदिवासी महिलांना,रांडा यांच्या साड्या सोडून हाणा,असे अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग करीत धमकी देत संबंधित आरोपीत मराठा समाजाच्या व्यक्तींनी मारहाणीचा प्रयत्न केला.दिनांक २९ मार्च २०२५ रोजी आदिवासी व्यक्तीस गंभीर दुखापत झाल्यानंतर सरकारी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याची तक्रार दाखल करीत नाहीत व पिडीत आदिवासी व्यक्तीस ज्याला गंभीर दुखापत झाली आहे,अशालाच धक्काबुक्की करून लाॅकअपमध्ये टाकायला लावले, म्हणून ज्याला दुखापत झाली आहे,त्यालाच तुम्ही अटक करत आहेत, मारहाण करणा-यांना अटक करीत नाहीत, आमच्या आदिवासींची महिलांचीही तक्रार दाखल करून घ्या,अशी आदिवासी समाजाच्या व्यक्तींची बाजू मांडायला गेलेल्या,विनंती करणा-या सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष यांनाच "तुम्ही आदिवासी समाजाची बाजू घेवू नका,ज्या आदिवासी माणसाला मारहाण झाली आहे,त्याला मी सुद्धा मारले आहे.मी तुमच्या आदिवासी महिलांची तक्रार घेत नाही,तुम्हाला कुठे जायचे ते जा.मी फक्त मराठा समाजाच्या महिलेची तक्रार घेणार. तुम्हाला काय करायचे ते करून घ्या.तुम्ही आदिवासी महिलांची बाजू घेतली तर तुमच्यावर बाईचा ३५४ चा गुन्हा दाखल करायला लावतो,अशी धमकी व दमदाटी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनाच श्री.शैलेंद्र देसले पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे यांना दिनांक २९ मार्च २०२५ रोजी दिली. शैलेंद्र देसले पोलीस निरीक्षक शहादा याच्यावर गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करा व शहादा पोलीस निरीक्षक पदावरून तात्काळ हटवा,अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तसेच आदिवासी समुदायाकडून येत्या ८ दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून पोलीस प्रशासनास देण्यात आला आहे.

शैलेंद्र देसले पोलीस निरीक्षक शहादा यांना सेवेतून निलंबित करून पदावरून हटवा- बिरसा फायटर्सची मागणी**.                                                          
Previous Post Next Post