*बिरसा फायटर्सच्या ३६७ व्या शाखेचे मालकातर येथे शानदार उद्घाटन ! (*शिरपूर प्रतिनिधी: )शिरपूर तालुक्यातील मालकातर येथे दिनांक २२ मार्च २०२५ रोजी बिरसा फायटर्स संघटनेच्या ३६७ व्या शाखेचे उद्घाटन करून कार्यकारणी गठीत करण्यात आली. बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, केंद्रीय कार्याध्यक्ष बिरबल पावरा,नंदूरबार जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष करन सुळे ,मध्यप्रदेश मधील बंधारा बुजूर्गचे अध्यक्ष विजय बरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालकातर येथे बिरसा फायटर्स संघटनेची शाखा बनविण्यात आली.गांव शाखेच्या कार्यकारणीत सावन पदम पावरा,कृष्णा चंद्रसिंग पावरा,सुरेश प्रल्हाद ठाकरे,संदीप नादर पावरा,प्रल्हाद गुलाब पावरा,पदम पाडका पावरा, नरेंद्र जाड्या पावरा,महेंद्र पाच्या पावरा,भाईदास विकला पावरा,दिनेश कान्या पावरा,रोहित अनिल पावरा,राहूल विनोद पावरा,महिला प्रतिनिधी सुशिला प्रल्हाद पावरा यांचा समावेश करण्यात आला आहे. मालकातर येथील रेशन वाटप बाबत समस्या, ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार, मध्यप्रदेश मधील बोगस मतदार,वनदावे व घरकुल बाबत चर्चा करण्यात आली.मालकातर येथील समस्यांवर काम करून सोडवण्याचे नवीन शाखेने एकमताने ठरले.बिरसा फायटर्सच्या कामगिरीला प्रभावित होऊन आम्ही मालकातर येथे बिरसा फायटर्सची शाखा बनवित आहोत. संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी काम करायला आवडेल,असे मत ग्रामस्थांनी मांडले. राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा व राज्याध्यक्ष गोपाल भंडारी यांनी बिरसा फायटर्स संघटनेविषयी माहिती देत मार्गदर्शन केले. दिवसेंदिवस बिरसा फायटर्सच्या शाखा वाढत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.बिरसा फायटर्स संघटनेत शामिल होण्यासाठी किंवा नवीन शाखा तयार करण्यासाठी बिरसा फायटर्स पदाधिका-यांशी संपर्क साधावा,असे आवाहन सुशिलकुमार पावरा यांनी केले.
byMEDIA POLICE TIME
-
0