माहिती अधिकारासाठी जुगनी येथील ग्रामसेवकाने अर्जदाराकडून तब्बल 19 हजार रुपये उकळले ग्रामसेवकावर कारवाईची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी, उदेसिंग पराडके माहिती अधिकार प्रचार संघटक अक्राणी, (अक्राणी प्रतिनिधी:) धडगांव तालुक्यातील जुगनी येथील ग्रामसेवकाने माहिती अधिकारात ग्रामपंचायतची माहिती देण्यासाठी अर्जदाराकडून तब्बल १९ हजार रुपये ऊकळल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.राजेश अशोक ब्राह्मणे असे या ग्रामसेवकांचे नाव आहे अर्जदार अशोक जोमा वळवी यांनी याबाबत गटविकास अधिकारी धडगांव यांच्याकडे दि २१ मार्च २०२५ रोजी एक तक्रार अर्ज दाखल केला आहे.अशोक वळवी राहणार जुगनी यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत सन २०१६ ते सन २०२२ अखेरची ग्रामपंचायत जुगनी येथील पेसा निधी व १४ वा १५ वा वित्त आयोगातून या गावात विविध विकास कामांचे स्टेटमेंट मिळावे त्यासाठी ३० ऑगस्ट २०२२ रोजी अर्जाद्वारे मागणी केली होती ती माहिती देण्यासाठी ग्रामसेवक जुगनी यांनी अर्जदार कडून चलनांच्या माध्यमातून तब्बल १९ हजार रुपये भरून घेतले व ७ हजार हजार प्रतीत माहिती देतो म्हणून सांगितले व फक्त ७०० पृष्ठ माहिती देवून बाकीचे माहिती नंतर देता म्हणून फसविले ३ वर्ष झाले तरी अर्जदारास माहिती दिली नाही म्हणून अर्जदार यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0