*सावद्यात जिलानी मिशन तर्फे इफ्तार पार्टी संपन्न*. (रावेर प्रतिनिधी (जमील शेख)सावदा :- येथील चांदनी चौक परिसरातील सरकार सादीक शाहा वली दर्गाच्या समोरील मैदानावर पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजे(उपवास)ठेवतात,या निमित्ताने जिलानी मिशन सावदा,लाला गृप तर्फे रोजदारांसाठी भव्य अशी इफ्तार पार्टीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.सदर ठिकाणी शहरातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी सामोहिक रित्या एकत्र बसून रोजदारांसोबत इफ्तार करू उपावस सोडले.यानंतर येथे विश्व शांतीसाठी प्राथना करण्यात आली.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे,मुस्लिम समाज प्रमुख जाहिद कारी,सावदा पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील,पो.का.निलेश बाविस्कर,पोलिस मयूर पाटील, माजी नगरसेवक फिरोज लेप्टी, चर्मकार सामाज संघटनेचे जिल्हा सचिव गजानन उर्फ गजू ठोसरे,माजी,नगरसेवक फिरोज खान पठाण,पत्रकार दिपक सरावगे,जेष्ठ पत्रकार युसूफ शाह,पत्रकार फरीद शेख,निसार अहमद,कामील मेंबर,माजी.गुड्डू मेंबर,समद गुलाब,शेख नाजीम,शेख कलिम जनाब,शौकत खान,बाबू मुस्लिम यांच्या सह संख्येने रोजदार उपस्थित होते.सदरची इफ्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी जिलानी मिशन चे,मोईन लाला,शेख चांद,अलिम शेख,शेख अदनान,जुनैद शेख, मोहसीन,इरफान शेख,सह सदस्यांनी मेहनत घेतली.
byMEDIA POLICE TIME
-
0