पोदार जम्बो किड्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूल मायणी विद्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी संपन्न. जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील बालचमुनी आपले विचार भाषणातून प्रकट केले मुलींच्यासाठी फॅशन शो नृत्य व संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलींनी विविध मनमोहक नृत्य अविष्कार सादर केले विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील महिला पालकांच्यासाठी भेटकार्ड तयार करून आपल्या महिला पालकांना त्यांनी महिला दिनाची भेट दिली. शाळेतील अध्यापिका प्रिया पवार यांनी महिला सुरक्षाविषयी माहिती दिली.व शाळेतील महिला शिक्षकांच्या साठी फनी गेम्स नृत्य व गायन या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. व सर्वच महिला विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी धमाल केली सिद्धी एज्युकेशन सोसायटीच्या सचिव आरती खिलारे यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.व प्रत्येक स्त्रीने अबला नसून सबला होणे गरजेचे आहे सावित्रीचा वसा हातात घेतलेले सर्व महिलांना सक्षम करण्यासाठी आपली संस्था सदैव तत्पर असेल . असे प्रतिपादन केले . कार्यक्रमाचे आयोजन सिद्धी एज्युकेशन सोसायटी व पोदार जंबो किड्स मायणी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले

पोदार जम्बो किड्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूल मायणी विद्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी संपन्न.                                                                      
Previous Post Next Post