देशमुख पेट्रोल पंप येळावी यांचा द्वितीय वर्धापन विविध उपक्रमाने केला साजरा. यावेळी चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन परमपूज्य श्री साईकिरण बाबाजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आजोबा ज्योती सुभाना कांबळे यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनव सामाजिक बांधिलकी म्हणून आबासाहेब देशमुख यांनी तुरची येळावी परिसरातील सर्वसामान्य रुग्णांच्यासाठी भारती रुग्णालया तुरची यांच्या विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबिरास परिसरातील नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे आबासाहेब देशमुख. शैलेश देशमुख. शुभम देशमुख. व गुणवंत कर्मचारी स्टाफचे परिसरातून जोरदार कौतुक होत आहे एक स्वातंत्र्य सैनिकाचा नातू काय करू शकतो हे आबासाहेब देशमुख यांनी दाखवून दिले. या पेट्रोल पंपाचे परिसरातून जोरदार कौतुक होत आहे. या कार्यक्रमास राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रासह मान्यवर उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0