अहेतेशाम अली मित्र परिवार तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शरबत आणी शीतपेय वाटप करीत शोभायात्रेचे स्वागत! (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.16:- अहेतेशाम अली यांचा जनसंम्पर्क कार्यालया भद्रावती येथे #भारतरत्न डॉ. #बाबासाहेब_आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रेचे स्वागत अहेतेशाम अली मित्र परीवार तर्फे करण्यात आले. या शोभायात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या समाज बांधवांचे मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी शोभायात्रेत सहभागी बांधवांना शरबत आणी शीतपेय वाटप केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विचारांचा प्रकाश मार्गदर्शक आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून घडवलेले संविधान, समतेचा आणि सामाजिक न्यायाचा मंत्र आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो. या प्रसंगी अहेतेशाम अली - माजी.नगराध्यक्ष न. प. वरोरा, शाहीद अली, धर्मेंद्र हवेलीकर,आदेश बावणे, सरफराज अली,वसीम शेख,कादर शेख,शाहेबाज शेख,महिंद्रा माणूसमारे, प्रीतीताई गाणीवर, आशिष दुपारे,मुस्ताक भाई,सुनील बिंजवे,लक्ष्मण नेहारे,रमेश मते या प्रसंगी उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0