लोकसेवेसाठी लॉयन्स क्लब अग्रेसर-स.पो.नि. प्रभाकर कवाळे. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी).सेलू : जन कल्याण आणि लोक सेवेच्या उपक्रमात लॉयन्स क्लब नेहमी सर्वात अग्रेसर आहे असे प्रतिपादन स.पो.नि. प्रभाकर कवाळे यांनी केले.येथील लॉयन्स क्लबच्या वतीने बुधवार दिनांक 16 एप्रिल रोजी नूतन रोडवर पानपोई च्या शुभारंभ प्रसंगी सपोनि प्रभाकर कवाळे बोलत होते.या प्रसंगी शिवनारायण मालाणी , राजेंद्र सराफ यांची प्रमुख उपस्थिती होती.तालुका अध्यक्ष सुयश पटवारी, सचिव डॉ बाळासाहेब जाधव ,उपाध्यक्ष अजित सराफ, कोषाध्यक्ष डॉ शैलेश मालाणी, सहसचिव डॉ अनुराग जोगदंड, डॉ.उमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली गोल्डन मेंबर दतात्रय सोळंके, रवी बोराडे,डॉ परेश बिनायके, डॉ सुदर्शन मालानी, डॉ कुंदन राऊत, अनुप गुप्ता , जयसिंग शेळके, कृष्णा काटे, सुभाष मोहकरे, कैलास करवा, सुनील करवा , बन्टी जाधव, शेख सोयल, बाळू डासाळकर आदींनी परिश्रम घेतले.
byMEDIA POLICE TIME
-
0