*पोलीस निरीक्षक निलेश देसलेंना नंदूरबार जिल्हाबाहेर हटवा,अन्यथा तीव्र आंदोलन- आदिवासी संघटना आक्रमक*. (शहादा प्रतिनिधी: ) शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी आदिवासी समाजातील पिडीत फिर्यादी कृष्णा वाघ यांस जातीवाचक अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली,फिर्यादी आदिवासी व्यक्तीलाच लाॅकअपमध्ये बंद करून ठेवले,आदिवासींची तक्रार न घेतली नाही,जातीभेद करत आदिवासी लोकांवर अन्याय केला, पोलीस ठाण्याचा मनमानी कारभार चालवणे ,मराठा समाजाच्या आरोपींना मोकाट सोडून दिले व आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा ,तुम्ही आदिवासींची बाजू घेतल्यास तुमच्यावरच बाईचा ३५४ चा गुन्हा दाखल करतो,अशी धमकी दिल्याबद्दल निलेश देसले यांच्यावर ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करा व नंदूरबार जिल्हाबाहेर तात्काळ हटवा,अन्यथा आदिवासी संघटना उग्र आंदोलन छेडेल, असा आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नंदूरबार श्रवण दत्त यांना याबाबत बिरसा फायटर्स, भारतीय स्वाभीमान संघ व विश्व आदिवासी सेवा संघ इत्यादी आदिवासी संघटनांच्या वतीने ७ एप्रिल २०२५ रोजी निवेदन देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,धडगांव बिरसा फायटर्सचे सुरतान पावरा, बान्या पावरा, वागऱ्या पावरा कुशाल पावरा,बिरसा फायटर्स शहादाचे सुनिल मुसळदे, बापू पवार, चंद्रसिंग सोनवणे,अंबर सोनवणे,हिलाल पवार इत्यादी बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांसह भारत स्वाभीमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना याबाबत विचारले असता निलेश देसलेंची चौकशी लावण्यात आली आहे ,अपर पोलीस अधीक्षक तक्रार अर्जाची चौकशी करत आहेत,चौकशीच्या आधारे निलेश देसले पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल,असे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी सांगितले.येत्या ८ दिवसांत निलेश देसलेंवर कारवाई न झाल्यास आदिवासी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा पोलीस प्रशासनास देण्यात आला आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0