*बिरसा फायटर्सचे १५ एप्रिल ला धडगांव येथे ठिय्या आंदोलन**गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना बिरसा फायटर्सचे निवेदन*. धडगांव प्रतिनिधी: भ्रष्टाचाराचाविरोधात व आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांकरिता बिरसा फायटर्सचे पंचायत समिती धडगांव समोर १५ एप्रिल २०२५ ला ठिय्या आंदोलन होणार आहे.आंदोलनाचे निवेदन धडगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे धडगांव यांना बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आले आहे.यावेळी तालुकाध्यक्ष सुनिल तडवी,दिलवर पाडवी, गौतम वसावे,सुरतान पावरा,गणपत वळवी, गुलाबसिंग पाडवी,वन्या पावरा इत्यादी बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते. धडगांव तालुक्यातील ग्रामपंचायत मोडलगांव, भोगवाडे, चूलवड, बोरवण, जुगनी येथील भ्रष्टाचाराची सखोल करून संबंधित सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी व तालुक्यातील भ्रष्टाचार झालेल्या ग्रामपंचायतींची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी.धडगांव तालुक्यातील ग्रामपंचायत जुगनी येथील ग्रामसेवकाने माहिती अधिकारात माहिती देण्यासाठी अर्जदार गणपत जोमा वळवी यांच्याकडून तब्बल १९००० रूपये उघडल्याप्रकरणी ग्रामसेवक श्री. राजेश अशोक ब्राम्हणे यांना तात्काळ सेवेतून निलंबित करा. धडगांव तालुक्यात माहिती अधिकार अधिनियम २००५ ची अंमलबजावणी केली जात नाही.अंमलबजावणी न करणा-या अशा जन माहिती अधिका-यांवर कायदेशीर कडक कारवाई करावी. ग्रामपंचायत जुगनी येथील ५ अपत्ये असणारे श्री.आट्या वेरांग्या वळवी यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करावे व तालुक्यातील अशे २ पेक्षा अधिक अपत्य असणा-याचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात यावे. धडगांव तालुक्यातील केलापाणी येथे जाणारा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावा, जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाण्याची सोय करावी, विजेची सोय करावी,शाळा व अंगणवाडी सुरू करावी.धडगांव तालुक्यातील शेलदा गांवातील लोकांचे वनदावे मंजूर करावेत, गांवात जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाण्याची सोय करावी,विजेची सोय करावी,शाळा व अंगणवाडी,ग्रामपंचायत इमारत बांधकामास वनविभागाची परवानगी मिळावी.धडगांव तालुक्यातील बिलगांव हेंद्र्यापाडा येथे जाण्यासाठी ३ किलोमीटरचा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा,जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाण्याची व्यवस्था करावी,विजेची सोय करावी,शाळा व अंगणवाडी सुरू करावी.धडगांव तालुक्यातील बिलगांव- पाटील पाडा ते अडीखूडी पाडा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावा.धडगांव तालुक्यातील असपा-पिप्री ते तिनसमाळ रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावा. धडगांव तालुक्यातील रस्त्यांचे व पुलांचे निष्कृष्ट कामांची सखोल चौकशी करून संबंधित अभियंता व ठेकेदारांवर कडक कारवाई करावी.पंतप्रधान घरकुल योजनेत भ्रष्टाचार करणा-यांवर कडक कारवाई करावी.धडगांव तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार विभाग येथील प्रकरणे निकाली काढावेत. आदिवासी विकास विभागाचा ४ हजार कोटी व समाजकल्याण विभागाचा ३ हजार कोटी असा एकूण ७ हजार कोटी निधी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने वळवलेला आहे,तो निधी आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभागास परत करावा.व्यक्ती व संघटना यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणारे, लोकशाही मूल्यांविरुद्धचे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक लागू करू नये.शेतक-यांचे १००% कर्ज माफ करावे.अशा विविध मागण्यांकरिता हे ठिय्या आंदोलन होणार आहे.या आंदोलनात सर्व आदिवासी संघटनांनी सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केले आहे.

बिरसा फायटर्सचे १५ एप्रिल ला धडगांव येथे ठिय्या आंदोलन**गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना बिरसा फायटर्सचे निवेदन*.                                 
Previous Post Next Post