गंभीर दाखल गुन्ह्यात पोलिसांना आरोपी मिळून येत नसल्याने तक्रारदारात भीतीचे वातावरण. अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी वेळेची संधी. यावल दि २१ ( सुरेश पाटील ) ३ एप्रिल २०२५ रोजी यावल पोलीस स्टेशनला एक गंभीर गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यातील आरोपीला अटक होऊ नये म्हणून आणि भुसावळ शहरातील एका पोलिसांच्या खाकी वर्दीच्या प्रभावामुळे तसेच दबदब्यामुळे भुसावळ येथील न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पुरेपूर वेळेची संधी उपलब्ध व्हावी यासाठी यावल पोलीस आरोपीला अटक करीत नसल्याची माहिती फिर्यादी कडून मिळाली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की पोलिसात कोणत्याही व्यक्तीने किंवा महिलेने तक्रार दिल्यास पोलीस तात्काळ संबंधित संशयित किंवा आरोपीच्या घरी फेऱ्या मारायला सुरुवात करतात आणि तात्काळ अटक करतात. काही गुन्ह्यामध्ये तर गुन्हा दाखल होण्याच्या आधी फिर्यादीला पोलीस स्टेशनला बोलावून गुन्हा दाखल केला जातो परंतु काही ठराविक गंभीर महत्त्वाच्या अशा गुन्ह्यात काही आरोपींच्या नातेवाईकाच्या किंवा स्वतःच्या आर्थिक सामाजिक प्रभावामुळे पोलीस हतबल होऊन त्याला अटक करत नाही आणि न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळेल पावतो त्याला पुरेपूर संधी उपलब्ध करून देत असतात असे बऱ्याच वेळा फिर्यादींच्या लक्षात आले आहे.अशाच प्रकारे यावल पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींनी भुसावळ येथील न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असून त्यात सुनावणीसाठी न्यायालयाने दोन तारखा ठेवलेल्या होत्या आणि आहेत, यादरम्यान म्हणजे दिनांक ३ एप्रिल २०२५ या १८ दिवसाच्या कालावधीत यावल पोलिसांना म्हणजे तपासी अंमलदाराला आरोपी मिळून येत नसल्याने पोलिसांच्या कामगिरी बाबत दाट संशय व्यक्त केला जात असून आरोपीला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून त्याला संधी उपलब्ध करून दिली जात आहे का..? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरोपीचा एक जवळचा नातेवाईक भुसावळ पोलीस दलात कामावर असून त्याच्या प्रभावामुळे आणि धबधब्यामुळे आरोपीला अटक होत नसल्याने फिर्यादीच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाल्याचे सुद्धा फिर्यादीने बोलताना सांगितले तरी यावल पोलिसांनी तात्काळ आरोपीस अटक न केल्यास या प्रकरणाला एक वेगळी दिशा मिळणार असल्याचे त्या समाजात बोलले जात आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0