*नंदाताई रणदिवे यांचे निधन*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती,दि.१:- कुरखेडा जि.गडचिरोली येथील जि.प.प्राथ.शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका तथा माजी जि.प.सदस्या श्रीमती नंदाताई शेषराव रणदिवे यांचे आज दि.१ जून २०२५ रोजी दुपारी ३.२० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या ८३ वर्षांच्या होत्या.त्यांच्या पश्चात २ मुले, ४ मुली, सुना, जावई, नातवंडे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.२ जून रोजी कुरखेडा येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0