*मानवत येथे माहेश्वरी समाज बांधवांच्या वतीने *महेश नवमी* मोठ्या उत्साहात साजरी (मानवत /प्रतिनिधी )माहेश्वरी समाजाची उत्पत्ती जन्मदिवस म्हणून माहेश्वरी समाजाच्या वतीने दरवर्षी महेश नवमी उत्साहात साजरी करतात. राजस्थान मधील सिकर जिल्ह्यातील लोहगड या पवित्र तीर्थस्थानी शेकडो वर्षांपूर्वी माहेश्वरी समाजाचा जन्म झाला. माहेश्वरी समाजाच्या वतीने भगवान महेश अर्थात महादेवाची पूजा करून महेश नवमी उत्साहात साजरी करतात. मानवत तालुका माहेश्वरी सभा च्या वतीने मानवत येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी होता साजरा केला. येथील लक्ष्मीनारायण मंदिर मधील भगवान महेश अर्थात महादेवाच्या मूर्तीची पूजा मानवत तालुका माहेश्वरी सभा चे अध्यक्ष संजय नंदलाल बांगड. व तालुका माहेश्वरी सभा चे इतर सदस्यांच्या हस्ते महादेवाची पूजा करण्यात आली. नंतर लक्ष्मीनारायण मंदिर मध्ये सामूहिक आरतीचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी मानवत शहरातील सर्व माहेश्वरी समाजाचे पुरुष, महिला, युवक, युवती, मोठ्या संख्येने उपस्थित होते.येथील कटारे गल्ली मधील कटारे हनुमान शेजारी असलेल्या महेश स्तंभते कटारे गल्ली, गोदु गल्ली, मुख्य मार्ग, मंत्री गल्ली, खंडेश्वर गल्ली, ते लक्ष्मीनारायण मंदिर पर्यंत भव्य रथ यात्रा काढण्यात आली. रथामध्ये भगवान महेश यांची प्रतिमा ठेवून रथयात्रा काढण्यात आली यावेळी मानवत शहरातील सर्व राजस्थानी समाजाचे तसेच माहेश्वरी समाजाचे पुरुष, महिला, युवक, युवती, मोठ्या संख्येने उपस्थित होते.महेश नवमीच्या निमित्ताने येथील तालुका माहेश्वरी महिला सभा च्या वतीने येथील माहेश्वरी मंगल कार्यालय मध्ये खामगाव येथील निवासी सौ.रूपल मोहताया़चे लव यू जि़दगी टॉक शोचे आयोजन करण्यात आले होते. तसेच तालुका माहेश्वरी सभा च्या वतीने येथील पोरवाल जिंनीग मध्ये भजन संध्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.***
byMEDIA POLICE TIME
-
0