न्यू हायस्कूल सेलूच्या मुख्याध्यापकपदी धनंजय भागवत यांची नियुक्ती. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी).सेलू : सेलू येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी पर्यवेक्षक धनंजय भागवत यांची पदोन्नतीने मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तशा आशयाचे पत्र मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण यांच्या स्वक्षरीने प्राप्त झाले आहे. त्यांच्या या निवडी बद्दल आ. सतीश चव्हाण,आ.विक्रम काळे, अनिल नखाते, अशोक काकडे, सहकारी शिक्षक व मित्रमंडळीने अभिनंदन केले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0