भद्रावती शहरातील सुप्रसिद्ध जैन मंदीरात भारतीय मजदूर संघाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा... (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती दि.24:- भद्रावती शहरातील सुप्रसिद्ध जैन मंदिर येथील भारतीय मजदूर संघाव्दारे मंदीरात भारतीय मजदूर संघाचा कार्यक्रम 23 रोज बूधवारला स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भाजपचे शहर अध्यक्ष तथा मजदूर संघाचे कार्याध्यक्ष अँड.सुनिल नामोजवार, अध्यक्ष मधूकर नागपूरचे, सचिव संदीप घोटेकर, सहसचिव वैशाली डांगे, विठ्ठल जगताप,अरुण सिडाम,सतीश मोगरे,मुकेश मिश्रा आदीं मान्यवर उपस्थित होते.यावेळी एडवोकेट सुनिल नामोजवार यांनी उपस्थितांना भारतीय मजदूर संघांच्या स्थापना दिनाविषयी वाटचाली विषयी माहिती सांगून मार्गदर्शन केले. अन्य मान्यवरांनी सुध्दा यावेळी आपापले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमाला जैन मंदिर येथील भारतीय मजदूर संघांचे पदाधिकारी तथा सदस्य व कामगार मोठ्या संख्येनी आवर्जून उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0