दि.२८ चोपडा ( संजीव शिरसाठ ) तालुक्यात झालेले गारपिट,वादळ व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करण्याचे आ.प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी दिल्या सूचना....चोपडा तालुक्यातील आडगाव, विरवाडे, विष्णापुर तसेच नागलवाडी, तसेच पुणऀ आदिवासी परिसरातील गावांमध्ये काल सायंकाळी अचानक अवकाळी पाऊस व गारपीट व वादळ झाल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्या अनुषंगाने चोपडा विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आडगाव,विरवाडे,व विष्णापुर परिसरात शेतकरी व नागरिकांची विचारपूस करुन धिर दिला व उपस्थित तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंखे,गटविकास अधिकारी एन. आर. पाटील व कर्मचारी यांना अवकाळी पाऊस व गारपिट झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शेती पिकांचे पंचनामे करण्याची सूचना आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दिल्या.
byमीडीया पोलीस टाईम
-
0