अधिक्षक चंदन मिसाळे यांना महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार जाहीर ... ( धर्माबाद तालुका प्रतिनिधी (गजानन वाघमारे) महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण परिषद महाराष्ट्राच्या वतीने 11 वा भव्य शिक्षण परिषद मेळावा जिल्हास्तरीय पुरस्कार शहरातील मतिमंद विद्यालय येथील वस्तीग्रह अधीक्षक चदंर मिसाळे यांना जाहीर झाला असून प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांच्या वतीने दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.शिक्षक दिनाचे औचित्य साधून तत्त्वज्ञानी विद्वान , भारतरत्न प्राप्तकर्ती माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त शहरातील रसिक नगर येथील रहिवासी फुले शाहू आंबेडकर चळवळीला गतिमान करणारे सामाजिक सलोखा जपणारे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मतिमंद विद्यालयाचे वस्तीग्रह अधीक्षक चंदर नारायणराव मिसाळे याना जाहीर झाला असून यावेळी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, सहशिक्षक अभिनंदन प्रचंड, दक्षता समिती सदस्य गंगाधर धडेकर, सामाजिक धार्मिक चैतन्य घाटे डॉ संदिप बनसोडे यांच्या हस्ते पुरस्कार निवड पत्र देण्यात आले.
byMEDIA POLICE TIME
-
0