मारूळ गावात गाणींचे साम्राज्य मारुळ गावात गटारी जाम – शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल.. (मारुळ ता. यावल –) गावातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारी काही दिवसांपासून जाम झाल्याने परिसरात साचलेले पाणी आणि दुर्गंधी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः शाळेतील लहान मुलांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.स्थानिकांच्या मते, गटारीत कचरा व चिखल साचल्याने पाणी वहात नसून रस्त्यांवर पाणी पसरले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढत शाळेत जाणे भाग पडत आहे. पाय घसरून पडण्याच्या घटना देखील घडत असून, पालकांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे.विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षणाचे वातावरण सुधारण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने तातडीने गटारी स्वच्छ करून पाणी वाहिनी सुरळीत करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

मारूळ गावात  गाणींचे साम्राज्य मारुळ गावात गटारी जाम – शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल..                                             
Previous Post Next Post