फैजपूर पोलीस स्टेशन तर्फे अमली पदार्थांविरोधात जनजागृतीसाठी निबंध स्पर्धा उत्साहात पार.. फैजपूर ( जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे )| 14 ऑगस्ट 2025अमली पदार्थांचे जीवनावर होणारे दुष्परिणाम आणि त्याविरोधातील जनजागृतीसाठी फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूल येथे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले विचार प्रभावीपणे मांडले.या स्पर्धेमध्ये कु.गुंजन तुषार किरंगे (११ वी) हिने प्रथम क्रमांक, कु.राजनंदिनी संतोष चव्हाण (१० वी) हिने द्वितीय क्रमांक, तर चि.नीरज किरण भारंबे याने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमास फैजपूर पोलीस स्टेशनचे API मोताळे साहेब व PSI बोकील साहेब त्यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक राहण्याचे आणि समाजात सकारात्मक भूमिका बजावण्याचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक तळेले सर व शिक्षकवर्ग यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला. अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीसाठी घेतलेला हा उपक्रम समाजप्रबोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.

फैजपूर पोलीस स्टेशन तर्फे अमली पदार्थांविरोधात जनजागृतीसाठी निबंध स्पर्धा उत्साहात पार..                             
Previous Post Next Post