**सा. पूष्यचे संपादक के.डी.वर्मा यांच्या सासूमाॅ श्रीमती सावित्रीबाई वर्मा दुःखद निधन. (*मानवत / वार्ताहर)———————— मानवत येथील सा.पुष्य चे संपादक व जेष्ठ पत्रकार के.डी.वर्मा यांच्या सासुबाई श्रीमती सावित्रीबाई प्रभूदयालजी वर्मा यांचे दि.19 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता अल्पकालीन आजाराने माजलगाव येथे त्यांच्या निवासस्थानी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्या 100 वर्षाच्या जवळपास होत्या. त्यांच्या मागे एक मुलगा, एक नातू, एक नात, चार मुली दोन जावई, तीन सुना,असा परिवार आहे. माजलगाव येथील वैकुंठ भूमीमध्ये दिनांक 20 ऑगस्ट रोजी त्यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयातील नातलग,व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
byMEDIA POLICE TIME
-
0