कावड याञेत घातपात घडवून आणलेल्या व्यक्तीवर गून्हे दाखल करण्याची मागणी. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.सेलू :) दि. ११ जुलै रोजी नियोजित कावड यात्रा काढल्याचा राग मनात राग धरून कावड यात्रेवर भक्तांवर भरधाव वेगात कारची धडक दिल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याने हा अपघात नसुन या घटनेमागे कांहीं षड्यंत्र असल्याचे आरोप करीत सदर घटनेची निःपक्ष चौकशी करून आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावे अशी पिडित कुटुंबातील व इतर नागरीकांनी पोलीस निरीक्षक सेलु यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे घटनेची माहिती अशी की दिनांक ११ जुलै रोजी सेलु शहरातील व ग्रामीण भागातील लोकांनी धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते ही यात्रा कावड यात्रा दिनांक १० जुलै रोजी सेलुवरुन पाथरी मार्ग रतनेशवर रामपुरी येथे जाऊन दुसऱ्या दिवशी पाथरी मार्ग सेलु परत येणार होती. त्या करीता रितसर परवानगी घेण्यात आली होती. कावड यात्रा चे आयोजन सुरू असताना नेहमीच वाद घालणारे अक्षय कोल्हाळ, गजानन खंडागळे,विलास बेटकर,शुभम धुमाळ, गणेश कोल्हाळ ई.तुम्ही कावड यात्रा काढण्यात येऊ नये व ती काढल्यास परिणाम तयार रहा अशी धमकी दिली होती. अश्या परिस्थितीत कपील पडुळ यांच्या अध्यक्षतेखाली कावड यात्रा घेण्यासाठी पुढील नियोजन केले ही कावड यात्रा परत येत असताना खेडुळा पाटीजवळ कावड यात्रेचा राग मनात धरून भाविकांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला व भरधाव वेगात कारची धडक दिल्याने दोन युवकांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे त्यामुळे सदरील आरोपींवर कठोर कारवाई करावी व जिवे मारण्याचा प्रयत्न व कट रचणे,खून करणे अशा कलमा लावून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर कपील पडुल, अशोक कुकडे, मोहन मोरे,दिपक चव्हाण, विष्णू भाबट, अश्विन पहारे, रोहीत सावंत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आज मागणीचे निवेदन मा पोलिस निरीक्षक सेलु पोलीस महासंचालक मुंबई, मुख्यमंत्री पोलीस अधिक्षक यांना देण्यात आले.
byMEDIA POLICE TIME
-
0