एसटी वाहक नागनाथ पेटेकर यांनी केले महिला प्रवाशांचे 22 हजार परत त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक (आंनद करूडवाडेनांदेड़ ग्रामीण प्रतिनिधि बिलोली ) तालुक्यातील खतगाव येथिल नागनाथ राजाराम पेटेकर, आजकालच्या काळामध्ये इमानदारी जणू हरवली असे वाटत असताना..माणूस माणसापासून दुरावलंत चाललेलाअसताना..एकमेकावरचा विश्वास उडत चालेला असताना...थोड्याशा मोहापाई एवढेच काय काही रुपयासाठी स्वतःच्या रक्ताच्या नात्यांतला जीवही घेण्यास मागेपुढे न पाहणारा माणूस.. अशा मानसिकता गढूळ झालेल्या समाजामध्ये पैशाच्या पुढे रक्ताची नाती ही विसरलेल्या या समाजामध्ये इमानदारी अजूनही जिवंत आहे याचा प्रत्यय नुकताच आला.देगलूर एस.टी डेपोचे प्रामाणिक वाहक,खतगाव येथील रहिवासी नागनाथ राजाराम पेटेकर यांनी नेहमीप्रमाणे देगलूर धर्माबाद एसटीने कार्य बजावत असताना त्यांच्या शेजारी वझरगा ता. देगलूर येथील महिला प्रवासी सौ.सविता ज्ञानेश्वर कोकणे -(सुर्यवंशी) यांनीही प्रवास करत होत्या पण वजरगा आल्यानंतरत्या उत्तरत असताना त्यांची 22 हजारांची पर्स तेथेच विसरून ते खाली उतरल्या. पुढे गेल्यानंतर हे एसटी वाहक नागनाथ पेटेकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ती बॅग तसेच ठेवून बस आगारा प्रमुखाकडे जमा केली आणि त्यांचा संपर्क साधून, त्यांना एसटी डेपो मध्ये बोलावून घेण्यात आले.त्यांना एवढी मोठी रक्कम सर्वात समक्ष सुपूर्द केली.त्यावेळी त्या महिला प्रवासांच्या चेहऱ्यावरला आनंद पाहण्यासारखा होता.एक एक पैसा जमा करून संसारासाठी उभा केलेले हे आर्थिक भांडवल क्षणात त्यांच्या समोरून गेले असे वाटत असतानाच नागनाथ पेटेकर यांनी दाखवलेली माणुसकी आणि प्रामाणिकपणा पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.आजच्या काळामध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे असेच म्हणावे लागेल.त्यांचा तो आदर्श त्यांची ती सामाजिक कार्याविषयी जाण तळमळ आणि मनामध्ये कोणत्याही पैशाचा लोभ न आणता प्रामाणिकपणाचे हे कार्य त्यांनी स्वकृतीतून करून दाखवले. आणि समाजापुढे एक आदर्श उभा केला.त्यांच्या या प्रामाणिक कार्याबद्दल भारताच्या 79 स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट या दिवशी त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी आगार व्यवस्थापक संजय जी अकुलवार साहेब,ट्राफिक इन्स्पेक्टर,सोनकांबळे साहेब, ए.टी.आय चोपडे साहेब व इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान करण्यात आला.नागनाथ पेटेकर यांनी आतापर्यंत एसटी वाहकाचे उत्तम प्रकारे काम केले आहे.ते राजाराम पेटेकर यांचे चिरंजीव साहित्यिक,चित्रकार बालाजी पेटेकर व रांगोळीकार शिवाजी पेटेकर यांचे छोटे बंधू होत. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे...
byMEDIA POLICE TIME
-
0