पुणे येथे मा.समाजकल्याण मंत्री बबनरावजी घोलप यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील उद्योग मूर्ती उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित - मा.दिलिप (आबा) बापू देशमुख..➖➖. राष्ट्रीय चर्मकार महासंघ व वैभवशाली अर्बन लिडकॉस आयोजित चर्मउद्योग परिषद मार्फत सामाजिक दखल घेत मा.सामाजिक न्याय मंत्री बबनरावजी घोलप,विधानसभा उपासभापती आण्णा बनसोडे, आमदार अशोक माने,मा.महापौर योगेश बहल,मा.राज्यमंत्री दर्जा ज्ञानेश्वर कांबळे, प्रदेश अध्यक्ष शांताराम कारडे,राष्ट्रीय नेत्या रक्ष्मीताई ठाकरे,यूवक प्रदेश अध्यक्ष रवींद्र खैरे,डॉ.भूजगंराव ओगले,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष रवींद्र सनके याच्या हस्ते उद्योग मूर्ती उद्योग महर्षी मा दिलिप (आबा) देशमुख यांना उद्योग रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सांगली जिल्ह्यातील उद्योग मूर्ती श्री दिलीप (आबा)बापू देशमुख यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेत याना पुरस्कार जाहीर झाला आहे याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघ संघटनेमार्फत मनःपूर्वक अभिनंदन. आपण नाजूक परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात सर्व अडचणी मात करून उद्योग निर्माण केला रोजगार निर्माण करून आपण भारत देश उभारण्यासाठी आदर्श काम करत आहात राष्ट्र उभारण्यासाठी अतुल्य योगदान दिले आहे देशाच्या वाटचालीसाठी आपले मोलाचे योगदान आहे त्याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित चर्मकार परिषद "उद्योग रत्न" पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनाजी माने, दादासाहेब शिंदे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0