गुरुकुल इंग्लिश स्कुल खतगाव येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. (आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधी रामतीर्थ खतगाव ) दि.१५ ऑगस्ट रोजी शुक्रवार स्वातंत्र्यदिन गुरुकुल इंग्लिश स्कूल खतगाव येथे आमचे गुरुवर्य येवतीकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गोविंद पाटील, , अमृत पाटील, नागनाथ पाटील, मधुकर पाटील शरद पाटील, रामेश्वर पवार, शाळेतील शिक्षक येडलेवार सर, ज्योती दाणेदार मॅडम, मयुरी दासतवार मॅडम गावातील पालक व नागरिक उपस्थित होते तसेच 750 वी अमृत महोत्सव निमित्त ज्ञानेश्वर महाराजांची जयंती करण्यात आली गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. सकाळी साडेसात वाजता राष्ट्रध्वजाचे पूजन करून यावेळी सर्वांनी एकमुखाने राष्ट्रगीत गायले. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, कार्यक्रम अतिशय सुंदर अशा पद्धतीने सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना चॉकलेट वाटप करण्यात आले. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद,पालक आणि ग्रामस्थ यांनी परिश्रम घेउन सोहळा पार पडला.
byMEDIA POLICE TIME
-
0