*मानवत नगर पालिकेचा अनोखा उपक्रम! मा. हिरामणजी धबडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण.. (मानवत: वार्ताहर)————————हर घर तिरंगा उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर मानवत नगर पालिकेत बुधवारी एक आगळा वेगळा आणि हृदयस्पर्शी सोहळा संपन्न झाला. मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी नगर परिषद कार्यालयातील ध्वजारोहणाचा मान यंदा वरिष्ठ सफाई कर्मचारी हिरामणजी धबडगे यांना देण्यात आला. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान तालुक्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत ध्वजारोहण होत असताना, मानवत नगरपरिषदेने सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचा नवा आदर्श घालून दिला. नगरपरिषद परिसरात झालेल्या या सोहळ्यात ध्वजवंदनानंतर उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात हिरामण धबडगे यांचा गौरव केला. सोहळ्यास किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन कोकर, संतोष सपाटे, सय्यद अन्वर, भगवानराव शिंदे, प्रकाश हरकळ, महेश कदम, भारत पवार, श्री. पोते, भागवत भोसले, अजय उडते, महादेव बळवंते, मुंजाभाऊ गवारे, एम.डी. पठाण, हनुमंत बिडवे, संजय रुद्रवार, राजेश शर्मा, रावसाहेब झोडपे, रामराव चव्हाण, दीपक सातभाई, नारायण व्यवहारे, शेख वसीम, रवी दहे, मनमोहन बारहाते, पंकज पवार, मुंजाभाऊ डोळसे, सचिन सोनवणे, बळीभाऊ दहे, सोनाजी काळे, नारायण काळे, लईक अन्सारी, वंदना इंगोले, सुनिता वाडकर, सीमा कांची, निवृत्ती लाड, संजय कुऱ्हाडे, सुनील कीर्तने, दीपक भदर्गे, जावेद मीर, शाम दहे, संजय नंदनवरे यांच्यासह अनेक मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे स्वच्छता सैनिकांचा आत्मसन्मान वृद्धिंगत झाला असून, नगरपरिषदेच्या या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. फोटो - नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहन करताना सफाई कर्मचारी मा. हिरामणजी धबडगे***
byMEDIA POLICE TIME
-
0