शालेय विद्यार्थ्यांसोबत पत्रकार मारोती एडकेवार यांचे वाढदिवस साजरा. (आनंद कुरुडवाड ेप्रतिनिधी/नांदेड ज़िल्हा ग्रामीण ) मीडीया पोलीस टाईम नांदेड जिल्हा प्रतिनिधी पत्रकार मारोती जकोजी एडकेवार, यांचे वाढदिवस हिप्परगा थडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थी यांना, पेन व खाऊ देऊन विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आले. मारोती एडकेवार, यांचं सामाजिक कार्यात मोठे योगदान असून, सत्यशोधक सामाजिक क्षेत्रात त्यांनी, सत्यशोधक पद्धतीने विवाह लावणे, व बहुजन समाजाचे आवाज म्हणून, वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात, वंचित बहुजन आघाडी मध्ये तालुका सदस्य सक्रिय सदस्य म्हणून आवाज उठवतात. पत्रकार म्हणून, त्यांना सामान्य जनतेचे आवाज म्हणून सगरोळी सर्कल मध्ये ओळखल्या जाते. अत्यंत गरीब परिस्थिती मधले सामाजिक कार्यकर्ते असून, फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने सर्वसामान्य माणसांमध्ये भेदभाव न करता समानतेने वागावे व बहुजनवादी विचार महामानवाचे विचार समाजामध्ये रुजवण्याचे कार्य करतात,उपजीविकेसाठी त्यांनी स्वतः त्यांनी छोटसं व्यवसाय करतात, फालव्या वेळेमध्ये समाजाचे कार्य करतात. अशा कार्यकर्त्यांना ग्रामीण भागामध्ये मोठे स्थान असून, पत्रकार मारोती एडकेवार यांनी त्यांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त, सगरोळी सर्कल मधील प्रत्येक शाळेला दरवर्षी, विद्यार्थ्यांना वही व पेन वाटपाचा कार्यक्रम करतात,त्यांचं हे आदर्श प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांनी घ्यावे, आपल्या वाढदिवसानिमित्त आनंद दुसऱ्यांना सोबत घेऊन करणे याच्यापेक्षा, आनंद दुसरं काय असू शकते. माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर आई-वडिलांनी तर जन्म दिलाच पण,या जगात माणूस म्हणून जगण्यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज,महात्मा बसेश्वर महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे,या सर्व महामानवांच्या कार्यांनी जगात जगण्याचे स्थान निर्माण झालं, व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाने आम्हाला, संघर्ष करण्याची ऊर्जा निर्माण होते.मी समाजातील दिन दलित, व गोरगरीब, विधवा, अपंग, लोकांचं सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी, मला ऊर्जा मिळते. त्यामुळे आज शेवटच्या क्षणापर्यंत मी समाजाच्या कार्यास वाहून घेईन, आज माझा वाढदिवस साजरा करण्याची संधी सुधा, माझे दैवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर,यांच्यामुळे मिळाले. म्हणून मी माझं जीवन आंबेडकर चळवळीला अर्पण करतो,आणि माझं प्रत्येक सुख आणि दुःख सर्वसामान्य लोकांपर्यंत व लोकांसोबत वाटतो असे,आमच्या आनंद कुरुडवाडे पत्रकार यांच्याशी मारोती एडकेवार यांनी सांगितले.
byMEDIA POLICE TIME
-
0