.*मानवत नगरपालिकेकडून ध्यान मंदिर व सभागृह उभारणी बांधकामाची प्रशिक्षक हितेन ठक्कर यांनी केली पाहणी*. (मानवत / प्रतिनिधी.—)मानवत शहरात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्याला चालना मिळावी या उद्देशाने मानवत नगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून भव्य ध्यानमंदिर व सुसज्ज सभागृह उभारणीचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आणि मार्गदर्शनाकरिता आर्ट ऑफ लिव्हिंगचे लाडके प्रशिक्षक हीतेन भैया ठक्कर मानवत येथे आगमन झाले.हीतेनभैया ठक्कर यांनी तब्बल १६ वर्षे बेंगलोर येथील आश्रमात गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्यासोबत थेट कार्य करत देश-विदेशात अध्यात्मिक सेवा दिली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे मानवत शहरातील आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी मानवत शहराचे युवा नेते डॉ.अंकुश लाड , मुख्याधिकारी नगर पालिका कोमल सावरे , सूर्यप्रकाश तिवारी, सुनील बोरवणे , श्याम दहे, माऊली भैया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नगरपालिकेकडून सुरू असलेल्या या कामामुळे मानवत शहराला ध्यान, योग व अध्यात्मिक साधनेसाठी भव्य व आधुनिक सुविधा लाभणार आहेत.या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणाईत जागरूकता, निरोगी जीवनशैली आणि समाजात शांतता व समरसतेचा संदेश पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.डॉ. अंकुश लाड यांच्या विकासकामांनी भारावलो – हितेन ठक्करमानवत शहरात आगमन झाल्यानंतर शहरातील गार्डन, नगरपालिका इमारत, शिवछत्रपतींचा पुतळा चौक, विहारीवरील गरुड तसेच विविध ठिकाणी उभारलेली सभागृह यांसारखी विकासकामे पाहून मी अक्षरशः भारावून गेलो, अशी भावना श्री श्री रविशंकर यांचे प्रतिनिधी व आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक हितेन ठक्कर यांनी व्यक्त केली."पुणे–मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये जसे दर्जेदार गार्डन असतात, तसेच सुंदर गार्डन मानवत शहरात पाहून आश्चर्याचा आनंद झाला. या विकासकामांमुळे मानवत शहराची ओळखच बदलली आहे. शहरवासीयांना डॉ. अंकुश लाड यांच्यासारखा योग्य, दूरदृष्टी असलेला आणि प्रत्यक्ष काम करणारा विकासपुरुष लाभला आहे, ही शहराची भाग्याची बाब आहे," असेही ठक्कर यांनी यावेळी स्पष्ट केले.***

मानवत नगरपालिकेकडून ध्यान मंदिर व सभागृह उभारणी बांधकामाची प्रशिक्षक हितेन ठक्कर यांनी केली पाहणी*.                                                                      
Previous Post Next Post