सर्कल सेक्रेटरी, जयराम जाधव तीन दिवसाच्या नागपूर क्षेत्रीय दौर्यावर. (मारोती एडकेवार जिल्हा/ प्रतिनिधी नांदेड)नांदेड :ऑल इंडिया पोस्टल एससी/एसटी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र परिमंडळ सचिव मा.जयराम जाधव हे बुधवार 1 ऑक्टोबर पासून नागपूर क्षेत्राच्या दौर्यावर आहेत. सदर दौऱ्यात सकाळी 11 वा.यवतमाळ हेड पोस्ट ऑफिस मध्ये नामफलक अनावरण करणार आहेत तसेच विभागीय अधिकाऱ्यां सोबत मीटिंग आयोजित करण्यात आली आहे, त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करतील. दुपारी 1.30 वा.वर्धा टपाल विभागीय कार्यालयाला सदिच्छा भेट असून विभागीय अधिकारी, सभासद आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. संध्याकाळी ६.३० वा.नागपूर दीक्षा भूमिवर होणार्या ६९ धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सेवाभावी उपक्रमाचे उद्घाटन करून या निमित्ताने अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या सत्कार सोहोळ्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तसेच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या मेडिकल कॅम्प च्या उद्घाटनप्रसंगी उपस्थिती दाखवतील अशी माहिती नागपूर क्षेत्राचे परिमंडळ सचिव मा.गौतम मेश्राम यांनी दिली आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0