**दंतचिकित्सक* डाॅ. ज्योतीताई ढमढेरे यांच्या हस्ते *सरस्वती* शिशू विहार विद्या मंदीर मधील मुलांची आरोग्य तपासणी*. (मानवत* / प्रतिनिधी. {अनिल चव्हाण }————————————*मानवत* शहरातील सौ. लता गणेश भरड संचलित सरस्वती शिशू विहार विद्या मंदीर मध्ये दिनांक 24 सप्टेंबर रोजी डॉ. ज्योती ढमढेरे यांनी विद्यार्थी व माता पालकांना दंत रोगा विषयी प्रबोधन केले. लहान मुलांच्या दातांच्या समस्या व आरोग्य विषयी बरीच हेळसांड किंवा दुर्लक्ष होत असल्यामुळे मुलांच्या दातांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी बालक आणि माता पालकांच्या मनावर बिंबवली तसेच यावेळी सुमारे 50 विद्यार्थ्यांची दातांची निशुल्क तपासणी करण्यात आली. प्रसंगी डॉ. ज्योतीताई ढमढेरे यांचे कडून यावेळी 50 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पेन्सिल वाटप करण्यात आले. हा उपक्रम सुमारे तीन-चार वर्षां पासून विविध शाळांमधून तसेच बालवाड्यांमधून दंत रोगाविषयी प्रबोधन तसेच तपासणी हा सामाजीक उपक्रम निशुल्क डॉ. ज्योतीताई ढंमढेरे चालवीत आहेत.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0