रोहणा येथील प्रकल्पग्रस्त शेकडो महिला बसल्या नदीपात्रात उपोषणाला.!*वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महासचिव यांनी घेतली उपोषणकर्त्या महिलांची भेट.!*. अकोला : मुर्तीजापुर तालुक्यातील रोहना या गावातील शेकडो महिला सतरा वर्षापासून जमीन धरणात गेली असल्यावर ही पुनर्वसन व सानुग्रह मदत आजपर्यंत या शासनाने दिली नाही या विरोधात आज रोहना येथील शेकडो महिला नदीपात्रात उतरून उपोषणाला बसल्या ही बातमी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांना समजले असता त्यांनी तात्काळ जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व महासचिव मिलिंद इंगळे आणि तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते रोहना ला उपोषणकर्त्या महिलांच्या भेटीकरिता पाठविले सदर महिलांचे उपोषणाला भेट देऊन जिल्हाध्यक्ष व जिल्हा महासचिव यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी व जलसंपादन कार्यकारी अभियंता यांना भेटून जाब विचारला.प्रतिनिधी निळकंठ वसू
byमीडीया पोलीस टाईम
-
0