‼️भारतीय जनसंघा चे संस्थापक व भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान स्वर्गीय पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त त्यांना भाजप मंडलातर्फे अभिवादन कार्यक्रम संपन्न‼️. (मनमाड -) भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान व एकात्ममानवतावादाचे प्रणेते तसेच अंत्योदयाचा मंत्र देणारे श्रध्देय स्वर्गीय पंडीत दिनदयाळजी उपाध्याय यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने करण्यात आले. मान्यवराच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. भारतीय जनसंघाचे मुख्य प्रवर्तक व प्रणेते भाजपा च्या कार्यकर्ता चे प्रेरणा स्थान असणारे स्वर्गीय दिनदयाळ उपाध्याय यांनी समाज व्यवस्थेला एकात्ममानवतावादाचा मंत्र दिला व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रगती पोहचली पाहिजे हा अंत्योदयाचा विचार मांडला आज पंडीतजींच्या विचारांवरच आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे सक्षम नेतृत्व मध्ये आणि निष्ठावानआणि देशभक्त कार्यकर्ता च्या शक्ति ने संपूर्ण देशात व 27 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली असल्याचे आपल्या मनोगतात भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी सांगितले. यावेळी सर्व कार्यकता नी एकात्म मानवतावाद ची शपथ घेऊन स्वर्गीय दीनदयाल उपाध्याय यांना सामुहिक अभिवादन करून आदरांजली वाहिली या कार्यक्रमास भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार ,भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत जिल्हा चिटणीस सौ अनिता इंगळे माजी नगरसेवक प्रमोद पाचोरकर, विजय मिश्रा, शहर सरचिटणीस आनंद काकडे दिव्यांग आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्ष सुनीता वानखेडे महिला मोर्चा च्या सौ जयश्री कुंभार, शहर उपाध्यक्ष गणेश कासार धीरज भाबड गोविंद सानप यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखे ने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन भाजप मनमाड शहराध्यक्ष संदीप नरवडे यांनी केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0